मुंबईबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे कंगणा राणावत आणि शिवसेनेमध्ये सुरू झालेला संघर्ष अद्याप सुरू आहे. तसेच पालिकेने तिच्या घरातील कार्यालयात उभारलेल्या अनधिकृत बांधकामावर कारवाई केली. तर आज अभिनेत्री कंगणा राणावत राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली.

मुंबई महापालिकेने कंगणाच्या ऑफीसवर कारवाई केल्यांनंतर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतरर कंगणाने आज राज्यपालांची भेट घेतली. या भेटीदरम्यान कंगणाची बहिण देखील उपस्थित होती.

या भेटीनंतर कंगणा म्हणाली, ”राज्यपालांना मी एक नागरिक म्हणून भेटले. माझ्यासोबत जे घडलं ते सर्व त्यांना सांगायला आले होते. राज्यपालांनी देखील माझं म्हणणं मुलीप्रमाणं ऐकून घेतलं. मला राजकारणाशी देणंघेणं नाही. मला आशा आहे की न्याय मिळेल.”

कंगनाने मुंबईतील परिस्थिती पाकिस्तानव्याप्त काश्मीरप्रमाणे असल्यासारखे म्हटल्याने टीका झाली होती. त्यामुळे निर्माण झालेल्या वादानंतर कंगनाने आपल्याला मुंबईत पुन्हा येऊ नको, अशा धमक्या दिल्या जात आहेत, असा आरोप केला होता.


Find out more: