
काँग्रेस नेते आणि माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी कृषी विधेयकावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकास्त्र सोडलंय. त्यांनी या संदर्भात ट्विट केलंय. शेतकऱ्यांचा मोदी सरकारवरून विश्वास उडाला आहे. कारण सुरूवातीपासून मोदीजींच्या बोलण्यात आणि कृतीत फरक राहिला आहे.
सजग शेतकऱ्याला माहिती आहे की, कृषी विधेयकामुळे मोदी सरकार आपल्या मित्रांचा व्यापार वाढवणार आणि शेतकऱ्याच्या रोजी रोटीवर हल्ला करणार आहे, अशा शब्दात राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे.
मोदीजींचे काही मित्र नव्या भारताचे जमीनदार असतील. कृषी बाजार बंद झाला की, देशाची अन्न सुरक्षा संपली, अशी टीका राहुल गांधी यांनी केली.
स्वराज्य आणि राष्ट्रवादाचा थेट संबंध अहिंसेशी आहे. भारतीय राष्ट्रवाद कधीही क्रौर्य, हिंसा आणि धार्मिक वादाला साथ देऊ शकत नाही, असंही काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी म्हटलंय.
