
महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत आल्यापासून भाजपकडून सातत्याने शिवसेनेवर आरोप केले जातायत. तर आता पुन्हा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.
नागपूरमध्ये झालेल्या एका पत्रकार परिषदेदरम्यान बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर टीका केली आहे. शिवसेना हा अत्यंत कन्फ्युज पक्ष असल्याचं फडणवीस म्हणाले आहेत.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, शिवसेनेची लोकसभेतली भूमिका वेगळी होती आणि राज्यसभेतली त्यांची भूमिका वेगळी आहे. मात्र यात काही आश्चर्य नाही. शिवसेनेला ही सवय आहे.
ज्यावेळी शिवसेना आमच्यासोबत सत्तेत होते तेव्हा ते सत्तेतही सहभागी होते आणि विरोधी पक्षाची भूमिकाही बजावत होते. त्यामुळे ते लोकसभेत ते वेगळं बोलतात आणि राज्यसभेत वेगळं बोलतात.”
फडणवीस पुढे म्हणाले, “शिवसेनेने आधी त्यांची भूमिका ठरवली पाहिजे. शिवसेने शेतीसंदर्भात कधी भूमिका मांडलेली नाही. त्यामुळे मी आता त्यांना आव्हान करतो की, महाराष्ट्रात त्यांचं सरकार आहे तर त्यांनी शाश्वती घ्यावी, एकही शेतकरी आत्महत्या करणार नाही.”