कृषी विषयक विधेयकावर दीर्घ चर्चा होणं गरजेचं होते. राज्यसभेच्या निलंबित सदस्यांनी आंदोलन मागे घेतलं नाही याचा आनंद आहे. त्यांच्या समर्थनार्थ आज दिवसभर अन्नत्याग करणार असल्याचं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे.
शरद पवार यांनी आज पत्रकार परिषद घेऊन कृषीविधेयकावरून राज्यसभेत झालेल्या गोंधळावर आपली प्रतिक्रिया मांडली.
मी गेली 50 वर्षे संसदीय राजकारण करत असून गेल्या 50 वर्षांत मी राज्यसभेच्या उपाध्यक्षांचं असं वर्तन पाहिलं नाही, अशा शब्दांत शरद पवार यांनी राज्यसभेचे उपाध्यक्ष हरिवंश नारायण सिंह यांच्यावर टीकाही केली.