
वेगाने पंचनामे करून शेतकऱ्यांना तत्काळ मदत द्यावी अशी मागणी करण्यात आलीये.
फडणवीस म्हणाले, बांधावर जाऊन आपण जी मदत जाहीर केलीये तशी मदत कधीतरी मिळेल अशी शेतकर्यांना आस आहे.
निसर्ग चक्रीवादळ, विदर्भातील पूर, पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्रातील अतिवृष्टी यावेळी मदत मिळाली नाही. आता किमान मराठवाड्यातील शेतकर्यांना तरी द्या, असं फडणवीस म्हणाले आहेत.