
राहुल गांधी पीडितेच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी जात असताना त्यांना धक्काबुक्की करण्यात आली. ही घटना लोकशाहीवर घाला घालणारी असून उत्तर प्रदेश सरकारची दडपशाही असल्याची टीका शिरुरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केली.
देशात लोकशाहीचा गळा घोटला जातोय, लोकशाहीचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं अमोल कोल्हे यांनी सांगितलं आहे.