
राहुल गांधींना जास्त गर्दीत फिरायची सवय नाही. त्यामुळे ते पडले. विरोधी पक्ष नेते म्हणून मी त्यांचा सन्मान करतो, असं वक्तव्य रावसाहेब दानवे यांनी केलं आहे.
राहुल गांधींना कोणीही धक्काबुक्की केली नाही. गर्दीतून जात असताना त्यांचा तोल गेला असावा. एवढ्या मोठ्या नेत्याला कोणीही धक्काबुक्की करु शकत नाही. अशा गर्दीत आम्ही देखील अनेक वेळा जातो. पब्लिकचा रेटा असतो, असं दानवे म्हणालेत.