
केंद्र सरकारच्या कायद्यावर विचार विनिमय करून धोरण निश्चित करण्यासाठी उद्धव ठाकरे यांची सह्याद्री अतिथीगृहावर विविध शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींशी बैठक झाली.
यावेळी उद्धव ठाकरे बोलत होते. आपल्याला या कायद्यांचे आंधळे समर्थनही करायचे नसून कायद्यातील त्रुटी, उणीव दूर करणे महत्त्वाचे आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.