अजूनही काही प्रमाणात आहे. त्यामुळे आम्ही ही परीक्षा पुढे ढकलत आहोत. परीक्षा कधी होणार याचा निर्णयही लवकरच घेतला जाईल, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. दरम्यान, मराठा समाजाच्या भावना समजून एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय राज्य सरकार ने घेतला याबद्दल मराठा समाजाच्या वतीने सरकारचे सर्वप्रथम आभार, असं संभाजीरांजेंनी म्हटलं आहे.
सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला तात्पुरती स्थगिती देण्यात आल्यानंतर ११ ऑक्टोबरला होणाऱ्या एमपीएससी परीक्षेविरोधात मराठा समाज आक्रमक झाला होता. ही परीक्षा पुढे ढकलण्यात यावी अशी मागणी मराठा समाजाकडून करण्यात येत होती. मराठा आरक्षणाबाबत आक्रमक झालेले संभाजीराजे छत्रपती यांनीही परीक्षा रद्द न झाल्यास एमपीएससीच्या केंद्रे ताब्यात घेण्याचा इशारा दिला होता.