सप्टेंबर अखेर राज्याचे हक्काचे असलेले जीएसटी परताव्याचे तब्बल 30 हजार कोटी रुपये केंद्र सरकारकडून येणे बाकी आहेत, ते तरी त्यांनी आधी द्यावेत, अशी मागणी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.

कोरोनामुळे महसूल कमी झाला आहे. अनलॉकची प्रक्रिया सुरु असून परिस्थिती बदलल्यानंतर चित्र बदलेल. परंतु सद्यस्थितीत कर्ज काढावे लागत आहे. महाराष्ट्र हे केंद्र सरकारला सर्वात जास्त कर देते. पण राज्याला मात्र मदत करताना केंद्राकडून हात आखडता घेतला जातो, असं थोरतांनी सांगितलं.

राज्यातील भाजपाचे नेते मोठ्या मोठ्या मागण्या करत आहेत. पण केंद्र सरकारकडे असलेले जीएसटीचे 30 हजार कोटी रुपये महाराष्ट्राला मिळावेत, यासाठी प्रयत्न करत नाहीत, असंही थोरात म्हणाले.

याचबरोबर, राज्यातील भाजपाचे नेते मोठ्या मोठ्या मागण्या करत आहेत. पण केंद्र सरकारकडे असलेले जीएसटीचे ३० हजार कोटी रुपये महाराष्ट्राला मिळावेत, यासाठी प्रयत्न करत नाहीत. हे जीएसटीचे पैसे तसेच राज्याला केंद्र सरकारकडून मोठी आर्थिक मदत मिळावी, यासाठी पंतप्रधान मोदी यांच्याकडे त्यांनी प्रयत्न करून भरघोस निधी आणावा, आम्ही त्यांचे अभिनंदन करू असे बाळासाहेब थोरात म्हणाले.



Find out more: