
उद्धव ठाकरे यांनी याच शिवारात येऊन 25 हजार व 50 हजार देऊ असे मागील वेळी जाहीर केले होते. आता आपण स्वतः मुख्यमंत्री आहात आपण घोषित केलेली ती मदत तात्काळ शेतकर्यांना मिळवून द्यावी, असं विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय.
फडणवीस यांनी सोमवारी सायंकाळी परभणी जिल्ह्यातील निळा शिवारातील नुकसानग्रस्त पिकांची पाहणी केली. यावेळी शेतकर्यांशी त्यांनी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.
शेतकर्यांच्या या संकटात आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत. आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी वेळप्रसंगी संघर्ष करू, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
शेतकर्यांनी पीकविमा भरला त्यांना तर शंभर टक्के पीक विमा मिळाला आहे. मात्र, सद्यस्थितीत पीक विमा कंपनीकडून शेतकर्यांचा छळ सुरू असल्याचा आरोप फडणवीसांनी केलाय.