
सियोल : सध्याच्या घडीला सोशल मीडिया हे एक प्रकारचे व्यसन झाले असल्यामुळे आपल्यामधील अनेकजण सोशल मीडियाच्या दुष्परिणामांकडे नेहमीच दुर्लक्ष करतात. सोशल मीडियाचे सध्या दुसरे नाव म्हणजे ट्रोलिंग. तुम्ही केवळ एका फोटोमुळे किंवा एका पोस्टमुळे ट्रोल होऊ शकता.
नुकत्याचा जाहीर झालेल्या एका रिसर्चनुसार सोशल मीडियावर वाढत्या ट्रोलिंगमुळं आत्महत्येच्या प्रमाणात वाढ झाले आहे. दरम्यान एका आंतरराष्ट्रीय पॉप स्टारने आता सोशल मीडियावरील ट्रोलला कंटाळून आत्महत्या केली आहे.
#NoBra ही मोहिम जगभरात चालवून चर्चेत आलेली इंटरनॅशनल पॉप स्टार सुलीने आपल्या राहत्या घरी आत्महत्या केली. पॉप स्टार आणि अभिनेत्री सुलीने वयाच्या 25 वर्षी सोमवारी आत्महत्या केल्यामुळे जगभरात एकच खळबळ माजली आहे. दरम्यान, आत्महत्या करण्यापूर्वी सुलीने एक चिठ्ठी लिहून ठेवली होती.
आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीबाबत पोलिसांनी कोणतीही माहिती दिलेली नाही आहे. पण काही काळापासून सुलीही नैराश्येत होती. सोशल मीडियावर तिच्या #NoBra मोहिमेला केले जाणारे ट्रोल यामागचे मूळ कारण होते. त्यामुळे सोशल मीडिया ट्रोलिंगला तिच्या आत्महत्येसाठी कारणीभूत ठरवले जात आहेत.
दरम्यान गेल्या काही काळापासून दक्षिण कोरियात #NoBra अशी मोहिम राबवली जात होती. सुली यामुळे सर्वात आधी लोकांच्या नजरेत आली. सुलीने आपल्या इन्स्टाग्रामवरून याची सुरुवात केली. ब्रा न घातलेला फोटो सुलीने शेअर केला होता, सोशल मीडियावर तिचा हा फोटो बराच व्हायरल ही झाला होता.
दरम्यान काहींनी सुलीचे कौतुक केले होते, तर काहींना तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली. आक्षेपार्ह शब्दात सुलीबद्दल कमेंट केल्या जात होत्या, त्यामुळे समाजात वेगळा बदल म्हणून सुरुवात करण्यात आलेली ही मोहिम सुलीने बंद केली आणि ती नैराश्याची शिकार झाली.
सीएनएनला दिलेल्या माहितीत पोलिसांनी, आत्महत्येप्रकरणी चौकशी सुरू आहे. सीसीटिव्ही फुटेज आम्ही पाहणार आहोत. सुलीच्या मॅनेजरचीही चौकशी केली जाणार आहे, मात्र अद्याप त्यांच्याशी कोणताही संपर्क झाला नसल्याचे सांगितले.