
महाराष्ट्र कन्या मानसी जोशी हिने दिव्यांगांच्या जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवून देशाचा गौरव वाढवला आहे. पॅरा वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी तब्बल १२ पदकं जिंकली आहेत. यात पॅरा बॅडमिंटनपटू मानसी जोशी हिनं विश्व पॅरा बॅडमिंटनचा किताब जिंकला आहे.
मानसीनं तीन वेळा विश्व चॅम्पियन झालेल्या पारुल परमारचा २१-१२, २१-७नं पराभव केला. २०११मध्ये झालेल्या अपघातात मानसीला आपला पाय गमवावा लागला. अवघ्या २२व्या वर्षी मानसीनं आपले पाय गमावले, मात्र तिनं हार न मानता बॅडमिंटन खेळण्याची स्फुर्ती दाखवली. मात्र सिंधूचे कौतक सुरू असताना, मानसी जोशी चे कर्तुत्व पडद्या आडचं राहिले.
तसेच विश्व चॅम्पियनशिपमध्ये पीव्ही सिंधूनं सुवर्ण पदक जिंकत संपूर्ण देशाचे मन जिंकले. सर्वच स्थरावर सिंधूचे कौतुक होत आहे, मात्र या सगळ्यात भारताच्या मानसी जोशीने बॅडमिंटन खेळाडूनं भारताचा झेंडा अटकेपार रोवला. मात्र माध्यमांकडून त्याची दखल घेण्यात आली नाही. हे माध्यमांच दुर्दैव आहे.
दरम्यान,दिव्यांगांसाठी असलेल्या जागतिक स्तरावरील पॅरा बॅडमिंटन स्पर्धेतील पदक विजेत्यांसाठी असलेल्या धोरणात काल सुधारणा करण्यात आली. या क्रिडापटूंना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशानं बक्षिस म्हणून क्रिडा मंत्री किरण रिजीजू यांनी 1 कोटी 82 लाख रुपये दिले आहेत. स्वित्झर्लंडमध्ये नुकत्याच पार पडलेल्या स्पर्धेत दिव्यांग खेळाडूंनी १२ पदकांची कमाई केली. त्यांचा काल नवी दिल्ली इथं गौरव करण्यात आला.