भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी आणि ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉटिंग यांनी आपापल्या संघांना अनेक मोठे विजय मिळवून दिले आहेत. त्यांची दिग्गज कर्णधारांमध्येही गणती होते. त्यामुळे अनेकदा कर्णधार म्हणून यांची तूलनाही होते.

या दोघांच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज फलंदाज माईक हसी खेळला आहे. त्यामुळे त्याला जेव्हा विचारण्यात आले की त्याचा आवडता वनडे कर्णधार कोण तेव्हा त्याने हा निर्णय कठिण असल्याचे म्हटले आहे पण नंतर त्याने पॉटिंगची निवड केली आहे.

इएसपीएन क्रिकइन्फोशी बोलताना तो म्हणाला, ‘हा खूप कठिण निर्णय आहे. पण मी रिकीचे नाव घेईल. मी कधीली धोनीबरोबर वनडे खेळलेलो नाही. त्यामुळे मी रिकीचे नाव घेत आहे.’

माईक हसी ऑस्ट्रेलियाकडून रिकी पॉटिंगच्या नेतृत्वाखाली खेळला आहे. तर आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्सकडून धोनीच्या नतृत्वाखाली खेळला आहे. तसेच हसी हा धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्सने 2010 आणि 2011 ला विजेतेपद मिळवलेल्या संघाचा भागही होता.


Find out more: