
लवकरच सानिया मिर्झा हिची बहिण अनाम आणि माजी क्रिकेटपटू मोहम्मद अझरुद्दीन यांचा मुलगा असद हे दोघेही विवाहबद्ध होणार आहेत. याबद्दलची माहिती खुद्द सानिया मिर्झा हिने दिली. अनाम आणि असद हे गेल्या काही वर्षांपासून दोघे एकमेकांना ओखळतात.
त्यांच्यामध्ये चांगली मैत्री आहे. हे दोघेही गेल्या काही दिवसांपासून विवाहबंधनात अडकणार असल्याची चर्चा सुरू होती. सानिया मिर्झा हिने ती खरीच असल्याचे स्पष्ट केले.
‘टाइम्स ऑफ इंडिया’ला सानिया मिर्झाने दिलेल्या मुलाखतीनुसार, अनामचे लग्न डिसेंबरमध्ये होणार आहे. नुकतेच आम्ही सगळे तिच्या बॅचलर ट्रिपसाठी पॅरिसला गेलो होतो.
तेथून नुकतेच परतलो असून तिचे लग्न एका चांगल्या मुलाशी होत आहे. याचा आम्हाला खूप आनंद झाला आहे. त्याचे नाव अर्थात असद असे आहे आणि तो अझरुद्दीन यांचा मुलगा आहे.