![](https://www.indiaherald.com/cdn-cgi/image/width=750/imagestore/images/sports/libra_libra/saynanehwal-415x250.jpg)
भारताला ऑलिम्पिकमध्ये बॅडमिंटन स्पर्धेत कांस्य पदक मिळवून देणाऱ्या फुलराणी अर्थात सायना नेहवालच्या बायोपिकमध्ये मुख्य भूमिका करणाऱ्या परिणितीचा फर्स्ट लुक खुद्द सायना नेहवालने नुकताच सोशल मीडियावर शेअर केला आहे.
थोड्याच दिवसांत हा चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात असून हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सायनाने शेअर केलेल्या पोस्टमध्ये अख्ख्या टीमला तिने शुभेच्छा दिलेल्या आहेत.
या बायोपिकसाठी सर्वात आधी श्रद्धा कपूरची वर्णी लागली होती. चित्रपटाचे चित्रीकरणही मागच्या वर्षीच्या सप्टेंबर महिन्यात सुरु झाले होते. पण तिला तारखांच्या अडचणीमुळे अखेरीस ह्या भूमिकेवर पाणी सोडावे लागले आणि मार्चमध्ये त्या भूमिकेसाठी परिणितीची निवड करण्यात आली.
‘स्टॅनली का डब्बा’ चे दिग्दर्शक तसेच ‘तारे जमीं पर’चे लेखक अमोल गुप्ते चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. हा चित्रपट परिणितीसाठी खूप महत्वाचा आहे. कारण तिचे गेले काही चित्रपट बॉक्स ऑफिसवर तितकीशी कमाल करू शकले नाहीत. ‘नमस्ते इंग्लंड’ आणि ‘जबरिया जोडी’ ह्या चित्रपटांची प्रेक्षकांनी दखलही घेतली नाही.