मुंबईचा युवा खेळाडू यशस्वी जयस्वालने विजय हजारे ट्रॉफीमध्ये दुहेरी शतक ठोकत एक नवा विक्रम केला आहे. यशस्वीने बंगळुरूमध्ये झारखंड विरूध्दच्या सामन्यात 154 चेंडूमध्ये 203 धावांची शानदार खेळी केली.
यशस्वी हा प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सर्वात कमी वयात शतक ठोकणारा खेळाडू ठरला आहे. त्याने 17 वर्ष 292 दिवस या वयात दुहेरी शतक ठोकले आहे. 21 व्या शतकात जन्माला आलेला यशस्वी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये दुहेरी शतक ठोकणारा पहिला खेळाडू आहे. म्हणजेच मागील 18 वर्षात जन्माला आलेल्या एकाही खेळाडूने दुहेरी शतक ठोकलेले नाही.
यशस्वीने 154 चेंडूत 17 चौके आणि 12 षटकारांच्या साह्याने 213 धावा केल्या. यशस्वीने आतापर्यंतच्या पाच प्रथम श्रेणी सामन्यात 44, 113, 22, 122 आणि 203 अशा धावा केल्या आहेत. प्रथम श्रेणीच्या सुरूवातीच्या पाच सामन्यात 540 धावा करण्याचा हा विश्व विक्रम आहे. याआधी दक्षिण आफ्रिकेच्या ग्रॅहम पॉलकने पाच प्रथम श्रेणी सामन्यात 493 धावा केल्या होत्या.
विजय हजारे ट्रॉफीमध्ये दुहरे शतक ठोकणारा यशस्वी तिसरा खेळाडू आहे. याआधी संजू सॅमसनने याच सीझनमध्ये गोवा संघाविरूध्द 212 धावांची शानदार खेळी केली होती. त्याआधी सर्वात प्रथम 2008 मध्ये कर्णवीर कौशलने 202 धावा केल्या होत्या.
प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये दुहेरी शतक ठोकणारा यशस्वी हा नववा खेळाडू आहे. 2014 मध्ये देखील त्याने 12 वर्षांचा असताना गिल्स शिल्ड स्पर्धेत 319 धावांची खेळी केली होती.