ऑल इंडिया सिविल सर्विसेस कबड्डी स्पर्धा २०१९-२० आजपासून सुरुवात होत आहे. राजीव गांधी गव्हर्नमेंट डिग्री कॉलेज, कोटशेरा, शिमला येथे यास्पर्धेचा आयोजन करण्यात आले आहे. १५ नोव्हेंबर ते १९ नोव्हेंबर २०१९ दरम्यान ही स्पर्धा होईल.

महिलांमध्ये सिविल सेक्रेटरीट राज्य आणि रेजिनल स्पोर्ट्स बोर्ड मिळून १४ संघ सहभागी होणार आहेत. तर पुरुषांमध्ये सिविल सेक्रेटरीट राज्य १८ संघ तर रेजिनल स्पोर्ट्स बोर्डचे ८ संघ सहभागी होत आहेत.

प्रत्येकाचे ४ गटात विभाजन केले असून महाराष्ट्र महिला संघ ब गटात कर्नाटक व राजस्थान सिविल सेक्रेटरीट संघ आहेत. महाराष्ट्र महिला संघाचा आज पहिला सामना कर्नाटक विरुद्ध होईल. महाराष्ट्र पुरुष संघ ब गटात आंध्रप्रदेश, तामिळनाडू, हरियाणा, एनसिटी दिल्ली हे संघ आहेत. महाराष्ट्र पुरुष संघाचा आज सामना होणार नाही.

पुरुषांमध्ये आज रिजनल स्पोर्ट्स बोर्ड मुंबईचा संघ विरुद्ध रिजनल स्पोर्ट्स बोर्ड हैद्राबाद असा सामना होईल. तर रिजनल स्पोर्ट्स बोर्ड बेंगळुरू विरुद्ध रिजनल स्पोर्ट्स बोर्ड अहमदाबाद अशी लढत होईल.


Find out more: