अॅडलेड: पाकिस्तानविरुद्ध येथील ओव्हल मैदानावर सुरू असलेल्या दुसऱ्या दिवसरात्र कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने त्रिशतक झळकवले आहे. त्याने हे त्रिशतक गुलाबी चेंडूवर झळकावले आहे. तो पाकविरुद्ध त्रिशतक ठोकणारा ऑस्ट्रेलियाचा दुसरा फलंदाज ठरला आहे.

यजमान ऑस्ट्रेलियाने पाकविरुद्ध सुरू असलेल्या या सामन्यात पहिल्या डावात ३ गड्यांच्या मोबदल्यात ५५० धावांचा डोंगर उभारला आहे. वॉर्नरच्या नाबाद त्रिशतकाचा त्यात समावेश आहे. त्याने हे त्रिशतक ३८९ चेंडूंमध्ये पूर्ण केले. त्यात ३७ चौकारांचा समावेश आहे. त्याने १२० षटकातील पहिल्या चेंडूवर षटकार ठोकून दिमाखात हे त्रिशतक साजरे केले. ३३५ धावांवर तो नाबाद राहिला. ऑस्ट्रेलियाने ब्रॅडमन आणि नंतर टेलर यांचा विक्रम मोडल्यानंतर डाव घोषित केला.

 

तत्पूर्वी १९९८ मध्ये पेशावर येथे ऑस्ट्रेलियाच्या मार्क टेलर याने नाबाद ३३४ धावांची खेळी केली होती. त्यानंतर वॉर्नरने हा पराक्रम केला आहे. सलामीवीर म्हणून त्रिशतक ठोकणारा तो ऑस्ट्रेलियाचा चौथा फलंदाज ठरला आहे. क्रिकेटच्या इतिहासातील हे चौथे वेगवान त्रिशतक ठरले आहे. भारताचा स्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवाग याच्या नावावर सर्वात वेगवान त्रिशतक ठोकण्याचा विक्रम आहे. चेन्नई येथे २००७-०८ साली दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळताना त्याने अवघ्या २७८ चेंडूंमध्ये त्रिशतक झळकावले होते.

 

आयसीसी टेस्ट चॅम्पियनशीपमध्ये वॉर्नर हा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. दक्षिण आफ्रिकेच्या विरुद्ध खेळताना पुण्यात भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याने २५४ धावांची खेळी केली होती. त्याला वॉर्नर आज मागे टाकले. कसोटी सामन्यात सलामीवीर म्हणून त्रिशतक ठोकणारा तो जगातील १६वा तर ऑस्ट्रेलियाचा चौथा सलामीवीर ठरला आहे.

 

Find out more: