भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली यांची बीसीसीआयच्या अध्यक्षपदी बिनविरोधात निवड करण्यात आली. महिनाभरापूर्वीच त्यांनी मुंबईत बीसीसीआयच्या अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला आहे. बीसीसीआयचे अध्यक्षपदी निवड होणारे गांगुली हे केवळ दुसरे कर्णधार आहे.

मात्र आज झालेल्या बीसीसीआयच्या बैठकीमध्ये अध्यक्षपदाबाबत महत्वाचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयानुसार आता भारताचे माजी कर्णधार सौरव गांगुली बीसीसीआयच्या अध्यक्षपदी २०२४ सालापर्यंत राहू शकतात.दरम्यान कार्यभार स्वीकारल्यानंतर गांगुली यांची पुढील नऊ महिन्यांसाठी अध्यक्षपदी निवड करण्यात आली होती.

तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या लोढा समितीच्या निर्णयानुसार हा कार्यकाळ ठरवण्यात आला होता. पण हा नियम बदलण्याची मागणी करण्यात आली आणि सर्वोच्च न्यायालयानेही या गोष्टी परवानगी दिल्यामुळे आता सौरव गांगुली बीसीसीआयच्या अध्यक्षपदी २०२४ राहण्याची दाट शक्यता वर्तविण्यात आली आहे.

Find out more: