नवी दिल्ली: पाकिस्तानी क्रिकेटपटू अब्दुल रज्जाकने काल भारतीय क्रिकेट संघातील सध्याचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराह याला ‘बेबी बॉलर’ म्हणून हिणवले होते. आता त्यानंतर आता याचवरुन त्याच्यावर आता टीका होत आहे. रझाकच्या वक्तव्याचा बुमराहच्या चाहत्यानंतर आता भारतीय क्रिकेटपटूंनी देखील समाचार घेतला आहे. भारतीय गोलंदाज इरफान पठाण याने अशा वक्तव्यांकडे लक्ष देऊ नका. असे काही वाचनात आलेच तर हसण्यावर घ्या आणि सोडून द्या, असे म्हटले आहे.

 

पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू अब्दुल रज्जाकने क्रिकेट पाकिस्तान या वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत बुमराहच्या गोलंदाजीवरुन त्याची खिल्ली उडवली होती. मी जगातील अनेक दर्जेदार गोलंदाजांचा सामना केल्यामुळे मी बुमराहसारख्या गोलंदाजाला सहज खेळलो असतो. ग्लेन मॅकग्रा, वसीम अक्रम यांच्यासारख्या गोलंदाजांचा मी सामना केला आहे. माझ्यासमोर बुमराह हा बच्चा आहे. त्याचे चेंडू मी सहज टोलवले असते. उलट त्याच्यावरच माझ्यासमोर गोलंदाजी करताना दबाव आला असता, असे रज्जाक म्हणाला होता.

 

भारतीय क्रिकेटप्रेमींनी रज्जाकच्या या वक्तव्यानंतर त्याच्यावर टीकेचा भडिमार केल्यानंतर इरफान पठाण याने देखील एक ट्विट केले आहे. इरफान पठाणने २००४ साली पाकचा माजी क्रिकेटपटू जावेद मियाँदाद याने केलेल्या वक्तव्याची आठवण करून दिली आहे. आमच्या गल्ल्या-गल्ल्यांमध्ये इरफान पठाणसारखे गोलंदाज सापडतात, असं मियाँदाद म्हणाले होते. पण त्यांची याच गल्ली गोलंदाजांना खेळताना प्रत्येक वेळी दांडी उडत होती, असे सांगून, अशा वक्तव्यांकडे दुर्लक्ष करा, हसा आणि सोडून द्या, असे ट्विट इरफानने केले आहे.

 

रज्जाकच्या वक्तव्याचा माजी क्रिकेटपटू आणि समालोचक आकाश चोप्राने अत्यंत बोचऱ्या शब्दांत समाचार घेतला. माणसाचे वय वाढणे हे नैसर्गिक आहे. पण एखाद्याची बौद्धिक क्षमता वाढणे ऐच्छिक असते, याचे हे आणखी एक उत्तम उदाहरण असून वेल प्लेड! असे चोप्राने म्हटले आहे.

Find out more: