आजचा दिवस रणजी ट्रॉफीच्या 85 वर्षांच्या इतिहासात काळादिवस ठरला आहे. मोहाली येथे सुरू असलेल्या पंजाब आणि दिल्लीच्या सामन्यादरम्यान मोठे नाट्य पाहायला मिळाले. पंजाबचा युवा फलंदाज शुभमन गिलने आउट झाल्यानंतर देखील मैदान सोडण्यास नकार दिला.

 

पंजाबने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सनवीर आणि शुभमन गिल हे सलामीला आले. मात्र दुसऱ्याच ओव्हरमध्ये सनवीर आउट झाला. त्यानंतर काळी वेळातच शुभमनने देखील विकेट गमावली. मात्र अंपायरच्या निर्णयावर सहमत नसलेल्या शुभमनने मैदान सोडण्यास नकार दिला.

 

अंपायर म्हणून पदार्पण करणाऱ्या मोहम्मद रफी यांना देखील शुभमनने शिवीगाळ केला व त्यानंतर दबावामुळे अंपायरने आपला निर्णय बदलत शुभनमला नॉट आउट दिले.

 

दिल्लीच्या संघाला हा बदलेला निर्णय आवडला नाही व त्यांनी मैदानातून बाहेर जाण्याचा निर्णय घेतला. यावेळी सामना देखील थांबला. अखेर मॅच रेफ्ररींनी मध्यस्थी केल्यानंतर सामना पुन्हा सुरू झाला. जीवनदान मिळाल्यानंतर देखील शुभमनने खास कामगिरी केली नाही. तो 41 चेंडूत 23 धावा करून बाद झाला.

Find out more: