एकदिवसीय क्रिकेटमध्ये ५००० धावांचा टप्पा वेगवान पार करणार भारतीय कर्णधार विराट कोहली सर्वात यशस्वी कर्णधार ठरला आहे. त्याने हा पराक्रम रविवारी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसर्या आणि निर्णायक एकदिवसीय सामन्यात केला.
विराटने कर्णधार म्हणून भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीला पछाडले आहे. हा टप्पा ओलांडण्यासाठी धोनीला १२७ डाव खेळावे लागले होते. तर, ८२ डावांतच विराटने ५००० धावा पूर्ण केल्या आहेत. या विक्रमात ऑस्ट्रेलियाचा दिग्गज माजी कर्णधार रिकी पाँटिंग तिसऱ्या स्थानावर आहे. कर्णधार म्हणून १३१ डावात पाँटिंगने ५००० धावा पूर्ण केल्या होत्या. भारताचा माजी कर्णधार आणि बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुलीने १३६ डावात ५००० धावा पूर्ण केल्या होत्या. तर, दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार ग्रॅमी स्मिथने १३५ डावात हा पराक्रम केला होता.