भारतीय संघाचा सलामीवीर रोहित शर्माने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या निर्णायक व तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात मोठी कामगिरी नोंदवली. एकदिवसीय क्रिकेटमधील ९ हजार धावांचा टप्पा हिटमॅन रोहित शर्माने पार केला आहे. रोहितने हा विक्रम ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या पहिल्याच षटकात फलंदाजी करताना केला आहे.
त्याचबरोबर एकदिवसीय क्रिकेटमध्ये वेगवान ७ हजार धावा पूर्ण करणारा रोहित शर्मा वेगवान सलामीवीर फलंदाज ठरला आहे. ऑस्ट्रेलियाबरोबरच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात रोहितने ४२ धावा करत हा विक्रम प्रस्थापित केला होता. रोहितने १३७व्या डावात सलामीवीर म्हणून ७ हजार धावा पूर्ण केल्या. हा पराक्रम करण्यासाठी अमलाने १४७ डाव खेळले होते. तर सचिन तेंडुलकरने १६० डावात ही कामगिरी केली होती.