भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर आणि वेस्ट इंडिजचा माजी महान गोलंदाज कर्टनी वॉल्श ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट संघाला प्रशिक्षण देणार आहे. हो, हे खरे आहे. ऑस्ट्रेलियाच्या जंगलात लागलेल्या आगीमुळे नुकसान झालेल्या लोकांसाठी मदतीचा हात म्हणून चॅरिटी सामन्याचे आयोजन करण्यात येणार आहे.
हा सामना ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिग आणि माजी गोलंदाज शेन वॉर्न इलेव्हनमध्ये खेळला जाणार आहे. या दोन्ही संघांसाठी सचिन तेंडूलकर व कर्टनी वॉल्शला प्रशिक्षक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. 8 फेब्रुवारीला हा चॅरिटी सामना खेळला जाणार आहे.
पाँटिग आणि वॉर्नसोबतच या सामन्यात ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू जस्टिन लेंगर, एडम गिलक्रिस्ट, ब्रेट ली, शेन वॉट्सन, एलेक्स ब्लॅकवेल आणि मायकल क्लार्क हे खेळाडू देखील मैदानात दिसतील. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने या सामन्याचे नाव ‘बुशफायर क्रिकेट बॅश’ असे नाव ठेवले आहे.
क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे सीईओ केव्हिन रॉबर्ट्स म्हणाले की, सचिन आणि वॉल्श या सामन्याशी जोडले गेल्याने खूप उत्साहित आहे. या दोन्ही महान खेळाडूंनी ऑस्ट्रेलियामध्ये आपआपल्या संघाला मोठे विजय मिळवून दिले आहेत. आम्ही सर्वांना आवाहन करतो की, या संकटता क्रिकेट ऑस्ट्रेलिया आणि ऑस्ट्रेलियन खेळाडूंच्या परिवारांनी सोबत यावे व आगपिडित लोकांची मदत करावी. या सामन्याद्वारे होणारी कमाई ऑस्ट्रेलिया रेड क्रॉसला दिली जाईल.
ऑस्ट्रेलियातील जंगलात लागलेल्या आगीत आतापर्यंत 29 हजार लोकांना प्राण गमवावे लागले आहेत. तर 2000 पेक्षा अधिक घरांचे नुकसान झाले आहे.