ऑस्ट्रेलियाच्या जंगलात लागलेल्या आगीत झालेल्या नुकसानीची भरपाई करण्यासाठी 8 फेब्रुवारी रोजी बुशफायर क्रिकेट बॅशमध्ये एक चॅरिटी सामना खेळवला जाणार आहे. हा सामना वॉर्न एकादश विरुद्ध पाँटिंग एकादश संघात खेळवला जाणार आहे.

 

या सामन्यासाठी वॉर्न एकादश संघाचा कर्णधार महान गोलंदाज शेन वॉर्न असेल तर पाँटिंग एकादशचा कर्णधार रिकी पाँटिंग असणार आहे. विशेष म्हणजे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर पाँटिंग एकादश संघाचा प्रशिक्षक असणार आहे. तर वेस्ट इंडिजचे अनुभवी वेगवान गोलंदाज कर्टनी वॉल्श वॉर्न एकादश संघाच्या प्रशिक्षकपदी दिसणार आहेत.

 

याबद्दल क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी केविन रॉबर्ट्स म्हणाले, ‘आम्हाला सचिन तेंडूलकर आणि कर्टनी वॉल्श यांचे स्वागत करताना आनंद होत आहे. आम्ही खास दिवसासाठी त्याची वाट पाहत आहोत. दोन्ही खेळाडू त्यांच्याकाळातील दिग्गज होते.’

 

तसेच पाँटिंगनेही सचिनबद्दल ट्विट केले आहे. पाँटिंगने ट्विटमध्ये म्हटले आहे की ‘सचिनला बुशफायर क्रिकेट बॅशमध्ये भाग घेताना पाहून आणि एका चांगल्या कारणासाठी तो त्याचा वेळ देत आहे, हे पाहून चांगले वाटत आहे. चांगल्या संघाला प्रशिक्षण देण्यासाठी तो योग्य आहे.’

 

 

Find out more: