
आयसीसीच्या ताज्या कसोटी क्रमवारीत भारतीय क्रिकेटचा संघाचा कर्णधार विराट कोहलीने अव्वल स्थान कायम राखले असून जगातील सर्वोत्तम फलंदाजाचे स्थान विराटने पुन्हा एकदा स्वत:कडे राखले. तर भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेची नवव्या स्थानावर घसरण झाली. ९२८ अंकांसह विराट कोहली पहिल्या स्थानावर आहे. ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह स्मिथ दुसऱ्या स्थानावर असून तो विराटपेक्षा १७ गुणांनी मागे आहे.
क्रमवारीत ७९१ गुणांसह भारताचा मधल्याफळीतील फलंदाज चेतेश्वर पुजारा सहाव्या स्थानावर आहे. तर नवव्या स्थानावर असलेल्या रहाणेकडे ७५९ गुण आहेत. गोलंदाजांच्या क्रमवारीत तीन भारतीय गोलंदाजांचा पहिल्या दहामध्ये समावेश आहे. ७९४ गुणांसह जसप्रीत बुमराह आठव्या, मोहम्मद शमी नवव्या तर आर अश्विन सहाव्या स्थानावर आहे. अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीत रविंद्र जडेजा ४०६ गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे.