नेपाळच्या संघाने शानदार कामगिरी करत क्रिकेट जगतात इतिहास रचला आहे. नेपाळने अमेरिकेला अवघ्या 35 धावांमध्ये गुंडाळले. ही एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील संयुक्तरित्या सर्वाधिक कमी धावसंख्या आहे. या आधी श्रीलंकेने 2004 मध्ये झिम्बाब्वेला 35 धावांवरच ऑल आउट केले होते.

 

पुरूषांच्या आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कप लीग 2 च्या 30व्या लढतीमध्ये हा लाजीरवाणा विक्रम अमेरिकेच्या नावावर झाला. नेपाळच्या त्रिभुवन यूनिवर्सिटी इंटरनॅशनल क्रिकेट ग्राउंड, किर्तिपूर येथे पार पडलेल्या सामन्यात अमेरिकेचा संघ 12 ओव्हरमध्येच ऑल आउट झाला. नेपाळचा लेग स्पिनर संदीप लामिछाने याने 16 धावा देत 6 विकेट्स आणि स्पिन सुशान भारीने अवघ्या 5 धावा देत 4 खेळाडूंना माघारी धाडले.

 

अमेरिकेचा संघ अवघ्या 72 चेंडूमध्येच ऑल आउट झाला. एकदिवसीय सामन्यात एखाद्या संघाची ही आतापर्यंतची सर्वात पारी आहे. या आधी सर्वात कमी चेंडूमध्ये पारी संपण्याचा विक्रम 2017 मध्ये झिम्बाब्वेच्या नावावर होता. त्यांनी 83 चेंडूचा सामना करताना 54 धावा केल्या होत्या.

 

अमेरिकेकडून केवळ एकमेव फलंदाज जेव्हिर मार्शल (16) दुहेरी आकडा गाठू शकला. त्याच्या व्यतरिक्त एकाही खेळाडूने 5 धावा देखील केल्या नाहीत. अमेरिकेच्या धावांचा पाठलाग करताना नेपाळने अवघ्या 5.2 ओव्हरमध्ये 2 विकेट गमावत 36 धावा केल्या.

एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यातील सर्वाधिक कमी धावसंख्या –

  • अमेरिका -35 धावा, विरुद्ध नेपाळ (2020)
  • झिम्बाब्वे – 35 धावा, विरुद्ध श्रीलंका (2004)
  • कॅनडा – 36 धावा, विरुद्ध श्रीलंका (2003)
  • झिम्बाब्वे – 38 धावा, विरुद्ध श्रीलंका (2001)
  • श्रीलंका – 43 धावा, विरुद्ध दक्षिण आफ्रिका (2012)
  • पाकिस्तान – 43 धावा, विरुद्ध वेस्टइंडीज (1993)
 

Find out more: