
भारतीय क्रिकेट संघ आणि आयपीएलमधील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कर्णधार विराट कोहलीने आपलाच संघ आरसीबीवर प्रश्न उपस्थित केले आहेत. आरसीबीने अचानक सोशल मीडियावर अकाउंट्सवरून स्वतःचा प्रोफाईल फोटो आणि नाव हटवले.
अचानक आरसीबीच्या ट्विटर अकाउंट्सवरून फोटो आणि नाव बदलल्याने चाहते देखील हैराण झाले. चाहत्यांसोबतच संघाचा कर्णधार विराट कोहलीने देखील यावर प्रश्न उपस्थित केले. विराटला देखील याबाबत काहीही माहिती नव्हती.
विराटने हे पाहिल्यावर तो स्वतः देखील हैराण झाला व याबाबत त्याने संघाच्या व्यवस्थापनावर प्रश्न उपस्थित केले. विराटने ट्विट केले की, पोस्ट गायब झाल्या आणि याबाबत कर्णधाराला देखील काहीही माहिती नाही. तुम्हाला जर मदतीची गरज असेल तर कृपया सांगा. केवळ विराटच नाही तर संघाचे खेळाडू युजवेंद्र चहल आणि एबी डिव्हिलियर्सने देखील ट्विट करत याबाबत व्यवस्थापनावर प्रश्न उपस्थित केले.