बीसीसीआयचा अध्यक्ष आणि टीम इंडियाचा माजी कप्तान रविवारी सायंकाळी बीसीसीआयच्या अन्य सदस्यांसह आशिया कप यजमानपद संबंधी निर्णय घेण्यासाठी होत असलेला बैठकीत सामील होण्यासाठी दुबई येथे जाणार होता मात्र करोनाचा प्रभाव पाहून त्यांनी दुबईला न जाण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. आता ही बैठक कधी होणार याचा कोणताही खुलासा केला गेलेला नाही.
यंदाच्या आशिया कपचे यजमानपद पाकिस्तानकडे आहे. पण भारताने हे सामने खेळण्यासाठी टीम इंडिया सुरक्षेच्या कारणास्तव पाकिस्तान मध्ये जाणार नाही असे जाहीर केले होते. त्यामुळे हे सामने दुबईत खेळविले जाणार असून त्यासंदर्भात बैठकीत निर्णय घेतला जाणार होता.
बीसीसीआय मधील काही जणांकडून मिळालेल्या माहितीनुसार गेल्या काही दिवसात जगभर फैलाव झालेल्या करोनाची पाउले संयुक्त अरब अमिरातीमध्येही पडली असून ७३० पेक्षा अधिकांना त्याची लागण झाली आहे. दुबईतील पर्यटक आणि रहिवासी त्यामुळे दहशतीखाली आहेत. अश्या परिस्थितीत दुबईला न जाण्याचा निर्णय गांगुलीने घेतला आहे. सप्टेंबर २०२० मध्ये आशिया कप स्पर्धा होणार आहेत.