मेलबर्न: दिवसेंदिवस कोरोनाग्रस्त नव्या रुग्णांच्या संख्या वाढ होत असतानाच एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. मेलबर्न क्रिकेट मैदानावर गेल्या ८ मार्च रोजी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आयसीसी महिला टी-२० विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना पार पडला. जवळपास ९० हजार प्रेक्षक हा सामना पाहण्यासाठी आले होते. या प्रेक्षकांपैकी एक प्रेक्षक कोरोनाग्रस्त असल्याची माहिती मेलबर्न क्रिकेट मैदानाच्या प्रशासनाने दिली आहे.

 

८६ हजार १७४ प्रेक्षक भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील अंतिम सामना पाहण्यासाठी आले होते. कोरोना व्हायरसची लागण ज्या व्यक्तीला झाली होती, ती व्यक्ती मैदानावरील सेक्शन ए ४२ मधील नॉर्दन स्टँडच्या लेव्हर २ येथे बसली होती. आरोग्य विभागाने एन ४२ मध्ये बसलेल्या सर्व प्रेक्षकांना नियमीत दिनक्रम सुरू ठेवण्यास आणि स्वच्छ राहण्याची सूचना केली आहे. जर खोकला आणि सर्दी सारखी लक्षणे आढळली तर डॉक्टरांचा सल्ला घेण्यास सांगितले आहे.

 

कोरोनाचे ११२ रुग्ण ऑस्ट्रेलियामध्ये देखील आढळले आहेत. त्यापैकी तिघांचा मृत्यू झाला आहे. महिला टी-२०चा अंतिम सामना मेलबर्न येथे झाला होता. मेलबर्न हा व्हिक्टोरिया प्रांताची राजधानी आहे. या प्रांतात कोरोना व्हायरसचे ११ जण आढळले आहेत. कोरोना व्हायरसची मेलबर्न शहरात राहणाऱ्या एका डॉक्टरला लागण झाली आहे. ऑस्ट्रेलियातील ७० कोरोना रुग्णांवर या डॉक्टरने उपचार केल्यानंतर ते स्वत: कोरोनाग्रस्त झाले. संबंधित डॉक्टराने स्वत: ला घरात बंद करून घेतले आहे जेणे करुन अन्य कोणाला याची लागण होऊ नये.

 

Find out more: