
नवी दिल्ली : कोरोनाचे संकट इंडियन प्रिमीयर लीगच्या आय़ोजनावर उभे राहिले असताना आता नवी माहिती समोर आली आहे. कोरोना व्हायरस देशभरात पसरत चालल्यामुळे स्पर्धा आयोजित करण्याच्या बाजूने सरकार नसल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले होते. परिणामी यंदाची आयपीएल स्पर्धा लांबणीवर पडली आहे.
आता 29 मार्च ऐवजी 15 एप्रिल पासून आयपीएल सुरू होणार आहे. नुकत्याच मिळालेल्या वृत्तानुसार इंडियन प्रिमीयर लीगचे आयोजन 26 मार्च ऐवजी 15 एप्रिलपासून करण्यात येणार आहे.
कोरोनाची देशातील परिस्थिती 15 एप्रिलपर्यंत आटोक्यात येईल असे मानले जात असल्यामुळे परदेशी खेळाडूंना व्हिसा दिला जाण्याची शक्यता आहे. आयपीएल होण्याबाबत तसेच त्याच्या आयोजनाबाबत गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरू होती. पण नुकत्याच मिळालेल्या वृत्तामुळे त्या सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.