कोरोना व्हायरसमुळे देशभरात 14 एप्रिलपर्यंत देशव्यापी लॉकडाऊन करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. अशा परिस्थिती गरीब व मजूरीवर काम करणाऱ्या मजूरांचे हाल होत आहे. मात्र अनेकजण अशा लोकांसाठी मदतीचा हात पुढे करत आहेत. क्रिडा क्षेत्रातील खेळाडू देखील कोरोनाशी लढण्यासाठी मदत करत आहेत.
बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुलीने देखील कोलकत्तामधील इस्कॉनच्या केंद्राची मदत करत जवळपास 20 हजार लोकांच्या जेवणाची व्यवस्था केली आहे.
इस्कॉन कोलकत्ताचे प्रवक्ता आणि उपाध्यक्ष राधारमन दास म्हणाले की, आम्ही दररोज 10 हजार लोकांचे जेवण बनवायचो. मात्र सौरव गांगुली यांनी मदत केल्यानंतर आम्ही दररोज 20 हजार लोकांना जेवण देत आहोत. दास म्हणाले की, मी दादाचा मोठा चाहता आहे आणि क्रिकेटच्या मैदानावर त्यांच्या अनेक इनिंग्स पाहिल्या आहेत. मात्र उपाशी लोकांनी जेवण देण्याची त्यांची ही पारी सर्वश्रेष्ठ आहे. आम्ही त्यांचे आभार मानतो. याआधी गांगुलीने रामकृष्ण मिशनचे मुख्यालय बेलूर मठला 2 हजार किलो तांदूळ दान केले होते.