![](https://www.indiaherald.com/cdn-cgi/image/width=750/imagestore/images/sports/libra_libra/ipl-possible-if-corona-regains-control-by-october-ashish-nehra744dc5c1-4ef7-4234-a3b4-2e0b3d79dc52-415x250.jpg)
जर कोरोना व्हायरस महामारी ऑक्टोंबरपर्यंत निंयत्रणात आली तर या वर्षाच्या अखेरच्या तिमाहीत यंदाचे आयपीएल होऊ शकते, असे भारताचा माजी वेगवान गोलंदाज आशिष नेहराला वाटते. यंदाचे आयपीएल हे 29 मार्चला सुरू होणार होते, मात्र कोरोना व्हायरसमुळे याला 15 एप्रिलपर्यंत स्थगित करण्यात आलेले आहे.
आशिष नेहरानुसार, आयपीएल ऑगस्टमध्ये होऊ शकत नाही. कारण या महिन्यात भारतातील अनेक ठिकाणी पाऊस पडतो. त्यामुळे सामने रद्द होण्याची शक्यता अधिक आहे. जर ऑक्टोंबरपर्यंत स्थिती नियंत्रणात आल्यास, आपल्या संपुर्ण स्पष्टता मिळेल. सध्या जगभरात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असल्याने यावर्षी आयपीएल होण्याची शक्यता खूपच कमी आहे.
याशिवाय नेहराच्या मते माजी क्रिकेटपटू युवराज सिंहने महेंद्र सिंह धोनीच्या नेतृत्त्वाखाली नेहमीच चांगली कामगिरी आहे. नेहराच्या मते, युवराजने धोनीच्या नेतृत्वाखील उत्तम कामगिरी केली आहे. मी जेवढे युवराजच्या करिअरला पाहिले आहे, त्यात त्याने 2007 आणि 2008 तसेच 2011 मध्ये धोनीच्या नेतृत्वाखील शानदार प्रदर्शन केले आहे.