''लय असत्याल मनमौजी पण लाखात एक तूच माझा फौजी'' असे म्हणते शीतल आणि अजिंक्यच्या प्रेमकथेने थोड्याच दिवसात प्रेक्षकांच्या मनात आपली वेगळी जागा निर्माण केली होती. अज्या आणि शीतलीच्या फॅन्ससाठी आमच्याकडे एक वाईट बातमी आहे. कारण ‘लागिरं झालं जी’  ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.

प्रेक्षकांनी निराश होण्याची गरज नाही कारण 'लागिरं झाली या' मालिकेच्या जागी  Mrs.मुख्यमंत्री नावाची मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

     शिवानी बावकर आणि नितेश यांच्या जोडीने दीड वर्षामध्ये संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात घर केलं आहे.  या मालिकेत आपल्या घरातीलच वाटावा असा युवक, म्हणजे अजिंक्य शिंदे याचा एका सामान्य मुलापासून फौजी होण्याचा प्रवास दाखवण्यात आला. अजिंक्य आणि शीतल या व्यक्तिरेखा महाराष्ट्रातील कुटुंबातील एक झाल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या फॅन्सना नक्कीच वाईट वाटले असले. 

     मात्र त्यांनी निराश होण्याची गरज नाही कारण 'लागिरं झाली या' मालिकेच्या जागी  Mrs.मुख्यमंत्री नावाची मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  ही मालिका २४ जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.मिथुन चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केल्यानंतर आता अभिनेत्री अमृता धोंगडे Mrs.मुख्यमंत्री बनून छोट्या पडद्यावर पदार्पण करणार आहे. नुकतंच या मालिकेचा एका टिझर रिलीज झाला त्यातून अमृताचा हटके अंदाज प्रेक्षकांच्या समोर आला.
     
      Mrs.मुख्यमंत्री या मालिकेलाही प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा  व्यक्त करण्यात येत आहे. ही मालिका संध्याकाळी ७ वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे, याचाच अर्थ लागिरं झालं जी या मालिकेला प्रेक्षकांना निरोप द्यावा लागेल.


Find out more: