काही दिवसांपुर्वी समोर आलेल्या रिपोर्टनुसार, अॅपल सीरी, गुगल आणि अँमेझॉन एलेक्सा तुमची खाजगी माहिती रेकॉर्ड करत आहे व ऐकत आहे. या रिपोर्टवरून मोठा गोंधळ झाला होता. मात्र आता मायक्रोसॉफ्टचे कॉन्ट्रँक्टर्स स्काइपवर होणारे बोलणे ऐकत असल्याचे समोर आले आहे.
रिपोर्टनुसार, मायक्रोसॉफ्टने देखील गुगल, अँमेझॉन आणि अॅपल सारखेच उत्तर दिले आहे. मायक्रोसॉफ्टनुसार, स्काइपवर होणारे संभाषणांचे रेकॉर्डिंग हे योग्य भाषांतर सेवा देण्यासाठी केले जाते. कंपनीचे म्हणणे आहे की, त्यांच्या पॉलिसीमध्ये हे आधीच स्पष्ट करण्यात आले आहे. असे असले ती, मशीन संभाषण ऐकतात की, माणसे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
मदरबोर्ड नावाच्या वेबसाईटने दावा केला आहे की, कपल्समध्ये होणारे संभाषण कंपनी रेकॉर्ड करते. कंपनी लोकांच्या खाजगी गोष्टी देखील रेकॉर्ड करत आहे.
मायक्रोसॉफ्टचे म्हणणे आहे की, यासाठी युजर्सकडून आधी परवानगी घेतली जाते. कंपनीच्या पॉलिसीमध्ये वॉईस डाटा रेकॉर्डिंगचा समावेश आहे. कंपनीच्या प्रवक्त्यानुसार, युजर्सला देण्याच्या डाटाचा वापर कोठे केला जात आहे याबद्दल माहिती देण्यात आलेली असते. काही दिवसांपुर्वीच रिपोर्ट समोर आल्यानंतर अँपल, गुगल आणि अँमेझॉनने रेकॉर्डिंग करणे बंद करणार असल्याचे म्हटले आहे.