रिलायन्स इंडस्ट्रीजच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत चेअरमन मुकेश अंबानी यांनी स्पष्ट केले होते की, कंपनी लवकरच 50 करोड युजर्सचा आकडा गाठणार आहे. जिओचे ग्राहक वाढवण्यामध्ये जिओ फोनचा मोठा वाटा आहे.

जिओ सध्या जिओ फोन 2 च्या विक्रीवर जास्त लक्ष्य देताना दिसत नाही. जिओ फोनच्या तुलनेत जिओ फोन 2 ची विक्री खास नाही. त्यामुळे जिओ फोन 2 ला आलेल्या प्रतिसादामुळे जिओ फोन 3 लाँच टाळण्यात आला आहे.

जिओ फोन 1 ला वेळोवेळी नवीन अपडेट्स मिळाले. जिओ फोन मार्केटिंग अॅप प्रमाणे काम करत आहे. जिओ फोनमध्ये मिळणाऱ्या अप्समध्ये कृषि, इंग्रजी शिका, मनोरंजन सारख्या अॅप्सचा समावेश आहे. 2 जी फिचर फोन आणि 4 जी फिचर फोनमध्ये हाच सर्वात मोठा फरक आहे.

जिओच्या ग्राहकांची संख्या 34 करोड पर्यंत पोहचली आहे. तर ग्लोबली फिचर फोन युजर्सची संख्या 2020 पर्यंत 37 करोड पर्यंत पोहचण्याचा अंदाज आहे. त्यामुळे 4जी फिचर फोनचा बाजार केवळ भारतातच वाढला आहे.

इंटरनेशनल डाटा कॉरपोरेशन इंडियाटे संशोधन संचालक नवकेंद्र सिंह म्हणाले की, ग्राहक संख्या वाढवण्यासाठी रिलायन्स जिओ फोनची संख्या कमी करू शकते. त्याचबरोबर बँटरी लाईफ आणि चांगल्या बिल्ड क्वालिटीबरोबर पुन्हा नव्याने फोन बाजारात लाँच केला जाऊ शकतो.

जिओ फोनच्या अपयशामागे त्याची किंमत मोठे कारण आहे. जिओ फोन 1500 रूपयांच्या रिफंडेबल सिक्युरिटी डिपॉजिट सोबत मिळतो. याचबरोबर कंपनीने 49 रूपयांचा मासिक प्लँन देखील आणला होता. मागील वर्षी जिओ फोनचा मार्केट शेअर 47 टक्के होते.

Find out more: