शाओमीने रेडमी 70 इंच स्क्रीन असणारा आपला पहिला स्मार्ट टिव्ही लाँच केला आहे. हा स्मार्ट टिव्ही चीनमध्ये लाँच करण्यात आलेला आहे. हा टिव्ही वॉल माउंट देखील करतो येतो आणि स्टँडवर देखील ठेवता येईल. रेडमी टिव्हीमध्ये 4K HDR सपोर्ट आणि  DTS एचडी बरोबरच Dolby Atoms ऑडिओ सपोर्ट देखील आहे.

रेडमी टिव्हीमध्ये तीन एचडीएमआय पोर्ट्स आहेत. दोन युएसबी पोर्ट्स आणि वायफाय ड्युअल बँड कनेक्टिविटी देण्यात आली आहे. या टिव्हीमध्ये 2 जीबी रॅम आणि 16 जीबी स्टोरेज देखील देण्यात आले आहे. हा स्मार्ट टिव्ही IoT कंट्रोल पेजच्या मदतीने दुसऱ्या शाओमी स्मार्ट डिव्हाइसबरोबर देखील कनेक्ट करता येईल. या टिव्हीची किंमत 3799 युआन (38000 रूपये) आहे.

रेडमीने स्मार्ट टिव्हीबरोबरच रेडमी बुक 14 देखील लाँच केले आहे. हे मागील जनरेशन रेडमी बुकचे अपग्रेडेट वर्जन आहे. रेडमी बुक 14 ला core i7 10th जनरेशन प्रोसेसरबरोबर लाँच करण्यात आले आहे.

कंपनीने दावा केला आहे की, याची बॅटरी 10 तास टिकेल. नवीन रेडमी बुक 14 बाकी फिचर्स जुन्या मॉडेल प्रमाणेच आहेत. Intel core i5 10th-gen बरोबर 8 जीबी रॅम आणि 512 जीबी पर्यंत स्टोरेज असलेल्या रेडमी बुक 14 ची किंमत 4499 युआन आहे तर Intel core i7 10th-gen ची किंमत 4999 युआन आहे.


Find out more: