टेलिकॉम कंपनी एयरटेलने एक नवा प्रीपेड प्लान जाहीर केला आहे. एयरटेल 599 रुपयांच्या प्रीपेड प्लानवर युझर्सला अनलिमिटेड कॉलिंगसोबतच 4 लाख रुपयांचा जीवन विमाही देत आहे. या प्लान अंतर्गत युझरला दररोज 2GB डेटा, अनलिमिटेड लोकल-STD कॉलिंग आणि डेली SMS सर्व्हिस मिळेल. या प्लानची व्हॅलिडिटी 84 दिवसांची असेल.
युझर्सला एअरटेलच्या 249 रुपयांच्या प्रीपेड प्लानमध्येही 4 लाखांचा विमा मिळतो. एयरटेलचा 499 रुपयांचा प्लान आधीपासूनच सुरु आहे. या प्लानची व्हॅलिडिटी 82 दिवसांची आहे. यामध्ये दररोज 2GB डेटा + अनलिमिटेड कॉलिंग + डेली SMS सर्व्हिस मिळते.
एयरटेलच्या 599 रुपयांच्या प्लानमध्ये 4 लाख रुपयांचा अधिकचा जीवन विमा जोडण्यात आला आहे. एयरटेलटच्या 599 रुपयांच्या रिचार्जसोबतच हा जीवन विमा ऑटोमॅटिकली सुरु होईल. 599 रुपयांचा पहिला रिचार्ज केल्यानंतर युझर्सला विम्यासाठी स्वत:ची नावनोंदणी करावी लागेल. युझर्स एयरटेल थँक्स अॅप, एयरटेलच्या अधिकृत रिटेल स्टोअर आणि SMS च्या माध्यमातून स्वत:ची या विम्यासाठी नावनोंदणी करु शकतात.
एयरटेलच्या मते, 18-54 वर्षांच्या सर्व युझर्सला जीवन विमा लागू असेल. प्रीपेड युझर्सला विम्यासाठी कुठल्याही प्रकारचं कागदोपत्री कामकाज किंवा आरोग्य तपासणी करण्याची गरज नाही. रिचार्जनंतर युझरची विम्यासाठी नोंदणी होताच त्यांना लगेच डिजीटली विमा सर्टिफिकेट पाठवण्यात येईल.
युझर्स त्यांच्या खात्रीसाठी या विम्याची एक प्रत त्यांच्या पत्त्यावर मागवू शकतात. एयरटेलचा हा प्लान सध्या तामिळनाडू आणि पुदुच्चेरी येथील युझर्ससाठी उपलब्ध आहे. येणाऱ्या काही महिन्यांमध्ये हा प्लान संपूर्ण देशात उपलब्ध केला जाईल.