OnePlus ने भारतात आपला आणखी एक नवा कोरा स्मार्टफोन लाँच केला आहे. OnePlus ने t सिरीजमधला OnePlus7t हा फोन लाँच केला आहे. या फोनमध्ये 3 कॅमेरे आणि आवाक्यात किंमत हेच याच वैशिष्टय आहे. तसंच OnePlus TV Q1 आणि OnePlus TV Q1pro हा टीव्हीही लाँच करण्यात आला आहे.
सहा महिन्यापूर्वीच OnePlus ने OnePlus 7 आणि OnePlus 7pro लाँच केला होता. आणि त्यानंतर आज OnePlus 7t लाँच केला आहे. फोटो आणि व्हिडिओचा वापर करणाऱ्यांना समोर ठेवून हा फोन तयार करण्यात आला आहे.
या फोनमध्ये 3 कॅमेरे देण्यात आले आहे. यात 48MP मेन कॅमेरा असणार आहे. तर,117° अल्ट्रा वाईड लेन्स आणि 2x टेलीफोटो लेन्स देण्यात आली आहे.
प्रोसेसरक्वा
लकॉमच्या नवीन स्नॅपड्रॅगन 855+ प्रोसेसर आणि सुपर फास्ट यूएफएस 3.0 स्टोरेज
बॅटरी
OnePlus ने डॅश चार्जर देऊन मोबाईल चाहत्यांची मनं जिंकली होती. हीच बाब लक्ष्यात ठेवून OnePlus ने सर्वच मोबाईलमध्ये ही सुविधा अधिक अपडेट देत आली. आता
OnePlus 7t हा फोनही अवघ्या 30 मिनिटांमध्ये 70 टक्के अर्थात निम्मा फोन चार्ज होईल, असा दावा कंपनीने केला आहे.सोबतच या फोनमध्ये नेटफ्लिक्सवर HDR10 + YouTube आणि अॅमेझान प्राइम व्हिडिओसाठीही HDR सपोर्ट करणार आहे.
Oxygen OS
या फोनमध्ये ऑक्सिजन ओएस अँड्रॉइड 10 व्हर्जन देण्यात आलं आहे. त्यामुळे One Plus 7t जर तुम्ही घेण्याचा विचार करत असाल तर नक्कीच ही डील फायद्याची ठरणार आहे.
किंमत
One Plus ने आधीच One Plus 7pro आणि One Plus 7 लाँच केल्यामुळे One Plus 7t ची किंमत किती असणार याची चांगलीच चर्चा रंगली होती. अखेर यावर पडदा टाकत One Plus 7t ची किंमतही 128GB साठी 37,999 रुपये इतकी असणार आहे. तर 256 GB हा 39,999 रुपये आहे.
One Plus tv
One plus ने आता टीव्ही उत्पादनामध्येही उडी घेतली आहे. आज One Plus7t सोबत One Plus TVQ1 आणि One Plus TVQ1pro हे टीव्हीही लाँच करण्यात आले आहे. OnePlus TV Q1 ची 55 इंच स्क्रीन असणार आहे. यामध्ये क्यूएलईडी डिस्प्ले आणि डॉल्बी व्हिजन सपोर्ट असणार आहे. तसंच अँड्रॉयड प्लॅटफॉर्मवर हा टीव्ही आॅपरेट होईल आणि पुढील 3 वर्षांपर्यंत याची सॉफ्टवेअर अपडेट मिळणार आहे. या टीव्हीची किंमत OnePlus TV Q1 69,900 आणि OnePlus TV Q1 Pro 99,900 इतकी असणार आहे.