नुकतीच आपल्या इलेक्ट्रिक नेक्सन कारच्या लॉन्चिंगची घोषणा देशातील दिग्गज वाहन निर्माता कंपनी असलेल्या टाटा मोटर्सने केली आहे. टाटा मोटर्स आपली नेक्सन ईव्ही (Tata Nexon EV) झिपट्रॉन टेक्नोलॉजीसोबत मिळून पुढील वर्षाच्या सुरुवातीला लॉन्च करणार आहे. 15 ते 17 लाख रुपयांच्या दरम्यान या कारची किंमत असणार आहे. टाटा नेक्सन ईव्ही ही कार एकदा चार्ज केल्यास 300 किलोमीटर धावेल असा दावा कंपनीने दावा केला आहे.

हायव्होल्टेज सिस्टम झिपट्रॉन टेक्नोलॉजीसोबत तयार करण्यात येत असलेली नेक्सन ईव्ही या कारमध्ये उपलब्ध असणार आहे. फास्ट चार्जिंग फिचर, बॅटरी आणि मोटरची 8 वर्षांची वॉरंटी या कारमध्ये असणार आहे. सोबतच कारमध्ये आयपी 67 स्टँडर्ड रेटिंगची सुविधा उपलब्ध असणार आहे.

याबाबत मीहिती देताना टाटा मोटर्सचे इलेक्ट्रिक मोबिलिटी बिझनेस आणि कॉर्पोरेट स्ट्रॅटर्जीचे अध्यक्ष शैलेश चंद्रा यांनी सांगितले की, ही घोषणा करताना आम्हाला खूपच आनंद होत आहे की, आर्थिक वर्ष 2019-20 च्या शेवटच्या तिमाहीत टाटा नेक्सन ईव्ही ही कार लॉन्च करण्यात येईल.झिपट्रॉन टेक्नोलॉजीचा वापर या कारमध्ये करण्यात येणार आहे.

नेक्सन ईव्ही या कारमध्ये थ्रिलिंग रोड परफॉर्मंस आणि झिरो इमिशिन मिळेल. या कारसाठी कंपनीतर्फे #TheUltimateElectricDrive असे कॅम्पेन सुद्धा सुरु केले आहे. कंपनीच्या मते, नेक्सन ईव्ही कारमधील मुख्य फिचर्सला फोकस करण्यासाठी हे कॅम्पेन सुरु करण्यात आले आहे. ही कार एकदा पूर्णपणे चार्ज केल्यास जवळपास 300 किलोमीटर चालवता येऊ शकते असे कंपनीने सांगितले आहे.

Find out more: