चीनी स्मार्टफोन कंपनी शाओमीने रेडमी नोट 8 सीरिज भारतात लाँच केली आहे. या फोनमध्ये गेमर्ससाठी खास मीडियाटेकचे गेमिंग सेंट्रिक मिड रेंज प्रोसेसर देण्यात आलेले आहे.
रेडमी नोट 8 च्या 4जीबी+64जीबी व्हेरिएंटची किंमत 9,999 रूपये आहे. तर 6जीबी+128 जीबी व्हेरिएंटची किंमत 12,999 रूपये आहे. रेडमी नोट 8 प्रो बद्दल सांगायचे तर 6 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज फोनची किंमत 14,999 रूपये आहे. तर 6जीबी+128 जीबी आणि 8 जीबी +128 जीबी व्हेरिएंटची किंमत क्रमशः 15,999 आणि 17,999 रूपये आहे.
या फोनचे वैशिष्ट्य म्हणजे यात 64 मेगापिक्सल प्रायमेरी कॅमेरा देण्यात आलेला आहे. याशिवाय यात 4 रिअर कॅमेरे देखील आहेत.
रेडमी नोट 8 प्रो च्या स्पेसिफिकेशनबद्दल सांगायचे तर यात 6.53 इंचचा फुल एचडी + डिस्प्ले देण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये मीडियाटेकचे Helio G90T प्रोसेसर देण्यात आला आहे. कंपनीने दावा केला आहे की, यात लिक्विड कूलिंग सपोर्ट देण्यात आला आहे. याशिवाय गेम टर्बो 2.0 मोड यात देण्यात आला आहे.
रेडमी नोट 8 प्रोच्या कॅमेऱ्याबद्दल सांगायचे तर यातील मेन कॅमेरा 64 मेगापिक्सल आहे. याशिवाय 8 मेगापिक्सलचा वाइड कॅमेरा आणि 2 मेगापिक्सलचे दोन कॅमेरे आहेत. सेल्फीसाठी यामध्ये 20 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा आहे.
फोनमध्ये 4,500mAh ची बॅटरी देण्यात आली असून, 18W फास्ट चार्जिंग सपोर्ट असेल. कनेक्टिविटीसाठी यात USB Type C सपोर्ट मिळेल.
रेडमी नोट 8 चे स्पेसिफिकेशन –
या स्मार्टफोनमध्ये 6.39 इंचाचा फुल एचडी डिस्प्ले देण्यात आला आहे. या मध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 655 प्रोसेसर देण्यात आला आहे. यामध्ये 4,000mAh ची बॅटरी देण्यात आली असून, 18W फास्ट चार्जिंग सपोर्ट असेल. कनेक्टिविटीसाठी USB Type C सपोर्ट मिळेल.
रेडमी नोट 8 आणि रेडमी नोट 8 प्रो या दोन्ही स्मार्टफोनच्या डिझाईनमध्ये फरक आहे. याशिवाय कॅमेरा प्लेसमेंट देखील वेगळे आहे.