गेल्या काही महिन्यांपासून आपल्या अॅपमध्ये काही नवे फीचर्स ट्रूकॉलर्स जोडत आहे. आता आणखी एक नवे फीचर ट्रूकॉलरने लाँच केले असून ‘ट्रूकॉलर ग्रुप चॅट ’ सुरू करण्याची घोषणा कंपनीकडून करण्यात आली आहे. इन्वाईट, हिडन नंबर, चॅट आणि एसएमएस दरम्यान स्विचिंगसोबतच कॅटेगराईज्ड इनबॉक्ससारखे फीचर यामध्ये देण्यात आले आहे. अँड्रॉईड आणि आयओएससाठी हे फीचर १८ ऑक्टोबरपासून सुरू करण्यात आले आहे. ट्रूकॉलरचे नवे व्हर्जन अॅप स्टोअर आणि गुगल प्लेमधून डाऊनलोड करता येऊ शकते.
व्हॉट्सअॅपला ट्रूकॉलरचे हे फीचर टक्कर देऊ शकेल असे म्हटले जात आहे. युझर्सची प्रायव्हसी ध्यानात ठेवून ग्रुप चॅट इन्वाईट हे फीचर तयार करण्यात आले आहेत. ग्रुपमध्ये युझरच्या परवानगीशिवाय कोणीही त्यांना अॅड करू शकणार नाही. नुकतेच हे फीचर व्हॉट्सअॅपनेही लाँच केलं होतं.
ट्रूकॉलरच्या दुसऱ्या फीचरबद्दल सांगायचे झाले तर आता हिडन नंबर फीचर यामध्ये दिले आहे. अनोळखी व्यक्तीला याद्वारे मोबाइल क्रमांक दिसणार नाही. त्या व्यक्तीचा क्रमांक ग्रुपमधील ज्या युझर्सचे मोबाइल क्रमांक सेव्ह असतील त्यांनाच दिसेल. एखाद्या व्यक्तीला जर दुसऱ्या व्यक्तीचा मोबाइल क्रमांक पहायचा असल्यास संबंधिताला समोरच्या व्यक्तीला आधी रिक्वेस्ट पाठववी लागणार आहे.
ट्रूकॉलर ग्रुप चॅट युझर्स सहजरित्या चॅट आणि एसएमएसमध्ये स्विच करू शकतात. त्या युझरला इंटरनेट कनेक्शन सुरू नसेल तरी ब्ल्यू आणि ग्रीन सेंट बटन पाहता येमार आहे. याव्यतिरिक्त कॅटेगराइज्ड इनबॉक्स फीचरही देण्यात आला आहे. याद्वारे सेव्ह केलेले मोबाइल क्रमांक आणि सेव्ह न केलेले मोबाइल क्रमांक आणि स्पॅम मेसेजेस वेगवेगळे पाहता येऊ शकतात.