तुम्ही इलेक्ट्रिक कार खरेदी करण्याचा विचार करत असाल आणि या कारची बॅटरी चार्ज होण्यासाठी लागणाऱ्या वेळेबाबत चिंता करत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. अमेरिकेच्या वैज्ञानिकांनी दावा केला आहे की, त्यांनी अशी बॅटरी तयार केली आहे जी कार चार्ज करण्यासाठी केवळ 10 मिनिटे घेते.

10 मिनिट चार्ज केल्यानंतर कार 320 किमी अंतर पार करू शकेल. असे असले तरी ही बॅटरी बाजारात येण्यासाठी 10 वर्ष लागतील.

एका अमेरिकन जर्नलमध्ये वैज्ञानिकांनी सांगितले की, बॅटरी लवकर चार्ज होण्यासाठी एका बॅटरीला 400 किलोबॉट एनर्जी घ्यावी लागते. मात्र आजच्या काळातील कार त्यासाठी सक्षम नाही. कारण त्यामध्ये लिथियम प्लेटिंगचा धोका असतो. याचा बॅटरीवर परिणाम होतो. सध्या बाजारात असलेल्या कार्सना फूल चार्जिंग करण्यासाटी फास्ट चार्जिंगद्वारे 3 तास आणि सामान्य चार्जरद्वारे 6-7 तास लागतात.

वैज्ञानिकांचे म्हणणे आहे की, येणाऱ्या काळात इलेक्ट्रिक कार्सची मागणी वाढेल. त्यामुळे बॅटरीविषयी रिसर्च करण्यात येत आहे. प्रयोगासाठी वापरण्यात आलेल्या बॅटरीला वैज्ञानिक 60 डिग्री सेल्सियसपर्यंत घेऊन गेले व परत थंड केले. यामध्ये उर्जा जमा करून बॅटरीची लाईफ वाढते. यात लिथियम प्लेटिंगचा धोका नसतो.


Find out more: