भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (इस्त्रो) प्रमुख के. सिवन यांनी चांद्रयान-2 मोहिम अद्याप संपलेली नसून, भविष्यात पुन्हा एकदा चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करण्याचा प्रयत्न केला जाईल, असे म्हटले आहे. इस्त्रोला 50 वर्ष पुर्ण झाल्याच्या निमित्ताने ते आयआयटी दिल्लीत आयोजित कार्यक्रमात बोलत होते.
सिवन म्हणाले की, येणाऱ्या काळात अधिक अँडवांस सेटेलाईट लाँच करण्याची योजना आहे. विक्रम लँडरचे सॉफ्ट लँडिंग झाले नसले तरी, चंद्रापासून 300 मीटर अंतरावर असे पर्यंत ते पुर्णपणे काम करत होते.
के सिवन पुढे म्हणाले की, आमच्याजवळ खूप महत्त्वाचा डेटा आहे. मी विश्वास देतो की, भविष्यात इस्रो आपला अनुभव आण तंत्राच्या साहय्याने सॉफ्ट लँडिंगचा पुन्हा प्रयत्न करेल.
त्यांनी सांगितले की, इस्त्रो सध्या आदित्य एल1 सौर मिशन आणि मानवीय अंतराळ योजनेवर काम करत आहे. एसएसएलव्ही डिसेंबर अथवा जानेवारीमध्ये उड्डाण घेईल. याशिवाय अनेक प्रोजेक्ट्सवर इस्त्रो सध्या काम करत आहे.