
ऑटोमोबाईल इंडस्ट्री सध्या हायब्रिड आणि इलेक्ट्रिक्स व्हिकल तयार करत आहे. जगभरातील अनेक देश इलेक्ट्रिक कारवर भर देत आहेत. या सर्वांमध्ये आता जापानने पुढे जात एक अशी खास कार तयार केली आहे, जी इको फ्रेंडली आहे. जापानमध्ये एक कॉन्सेप्ट कार तयार करण्यात आली असून, या कारचा अधिकतर भाग लाकडापासून बनविण्यात आलेला आहे.
कॉन्सेप्ट कार नॅनो सेल्युलोज व्हिकलला टोकियो मोटार शो 2019 मध्ये सादर करण्यात आले आहे. या कारला कंपनी आणि युनिवर्सिटीने मिळूनडेव्हलप केले होते. त्यानंतर 2016 मध्ये जापानच्या पर्यावरण मंत्रालयाने ही कार तयार केली.
नॅनो सेल्युलोज व्हिकलचे (एनसीव्ही) कॉन्सेप्ट खूपच मॉर्डन आहे. ही कार फायबरचा वापर करून बनविण्यात आली आहे. हे फायबर मटेरियल लाकूड, एग्रीकल्चरल वेस्ट आणि दुसऱ्या ऑर्गेनिक वस्तूंपासून बनते. सॅल्यूलोज नॅनो बायबर हे स्टीलच्या वजनाच्या केवळ 20 टक्के असते. मात्र हे 5 पट अधिक मजबूत असते. याचा वापर इंजेनिअरिंग मटेरियलच्या स्वरूपात केला जातो.
लाकडापासून बनलेली ही कॉन्सेप्ट कार, सुपरकार प्रमाणेच दिसते. बटरफ्लाइ डोरसोबत कारचे एक्सटीयर डिझाईन आणि शार्प अँग्लस लॅम्बोर्गिनी आणि पागिनीच्या लूकप्रमाणे दिसते. या कारचे इंटेरियर खूपच ट्रेडिशनल आहे. यात लाकडाचेच डॅशबोर्ड, पांढरी किमोनो-एस्क्यू सीट देण्यात आली आहे. या कारची टॉप स्पीड ताशी 20 किलोमीटर आहे. ही कार हायड्रोजन फ्यूल सेल्सद्वारे पॉवर्ड आहे.