अ‍ॅपलने आपले बहुप्रतिक्षित नॉइज कॅन्सिलेशन एअरपॉड्स प्रोची विक्री भारतात सुरू केली आहे. अमेरिकेत 30 ऑक्टोंबरपासून याची विक्री सुरू करण्यात आली होती. नवीन एअरपॉड्समध्ये एक्टिव नॉइज कॅन्सिलेशन फीचर देण्यात आले आहे.

यामध्ये डेडिकेटेड ट्रांसपेरेंसी मोड फीचर मिळते. सोबतच वायरलेस चार्जिंग केस देखील मिळते. कंपनीने दावा केला आहे की, एक्टिव नॉइज कॅन्सिलेशन सुरू असल्यावर फूल चार्जमध्ये साडेचार तास गाणी ऐकता येतील.

एअरपॉड्स प्रो देशभरातील कोणत्याही अ‍ॅपलच्या अधिकृत स्टोरमधून खरेदी करता येतील. भारतात याची किंमत 24,900 रूपये आहे. लवकरच याची विक्री अमेझॉन, फ्लिपकार्ट सारख्या ई-कॉमर्स साईट्सवर सुरू होईल.

अ‍ॅपल एअरपॉड्ससोबतच सेंकड जनरेशन एअरपॉड्स विथ रेग्यूलर चार्जिंग केस (14,900 रुपये) आणि एअरपॉड्स विथ वायरलेस चार्जिंग केस (किंमत 18,900 रुपये) सुरू झाली आहे.

एअरपॉड्स प्रो चे खास फीचर्स –

एअरपॉड्स प्रो चे खास फीचर्स म्हणजे यात नॉइज कँन्सिलेशन हे फीचर्स देण्यात आलेले आहे. यामुळे युजर्सला बाहेरील आवाज ऐकू येणार नाही. याशिवाय यात एअर फीट टीप टेस्ट हे नवीन फीचर देण्यात आले आहे. यानुसार, कानात एअरपॉड्स फीट बसले की नाही याची देखील माहिती मिळेल.

एअरपॉड्स प्रो अ‍ॅपल एच1 चिपवर बेस्ड आहेत. हे आयओएस 13.2, आयपॅड ओएस 13.2, वॉच ओएस 6.1, टिव्ही ओएस 13.2, मॅक ओएस कॅटालिना 10.15.1 वर चालणाऱ्या डिव्हाईसलाच सपोर्ट करते.


Find out more: