
नॉइज कंपनीने भारतीय बाजारात स्वस्तात मस्त असे वायरलेस नेकबँड्स स्टाइल ब्लूटूथ ईयरफोन लाँच केले आहेत. याचे नाव ट्यून फ्लिक्स ब्लूटूथ नेकबँड आहे. या ईयरफोनची किंमत 2,199 रुपये आहे. हा ईयरफोन स्पेस ग्रे, टेल ग्रीन आणि ब्राँझ ग्रे या तीन रंगामध्ये उपलब्ध आहे.
नॉइज कंपनीच्या अधिकृत वेबसाइट आणि फ्लिपकार्टवरून हा ईयरफोन खरेदी करता येईल. कंपनीने यामध्ये क्वॉलकॉम सीव्हीसी 8.0 टेक्नोलॉजीचा वापर केला आहे. हे व्हॉइस कॉलिंग दरम्यान नॉइज कॅन्सलेशनसोबत साउंड क्वॉलिटी देखील सुधारते.
यामध्ये ब्लूटूथ व्हर्जन 5.0 कनेक्टिव्हिटी देण्यात आली आहे. म्हणजेच युजर एकाच वेळी दोन डिव्हाईसशी ईयरफोन कनेक्ट करू शकतील.
कंपनीने दावा केला आहे की, सिंगल चार्जमध्ये याद्वारे नॉन स्टॉप 12 तास गाणी ऐकू शकता. आयफोन अथवा अँड्राईड स्मार्टफोन कनेक्ट केल्यावर यात सिरी व गुगल असिस्टेंट एक्टिव करता येते. यामध्ये प्लेबॅक, वॉल्यूम, कॉल बटन देण्यात आलेले आहेत. या ईयरफोनला IPX5 रेटिंग मिळाली आहे. म्हणजेच पाणी, धूळ, माती, घाम यामुळे काहीही नुकसान होणार नाही.