Xiaomi ने 10 डिसेंबरला चिनी बाजारात आपले स्मार्टफोन्स लॉन्च करण्याची सर्व तयारी केली आहे. विशेष म्हणजे या इवेंट मध्ये कोणते स्मार्टफोन्स लॉन्च केले जाणार आहेत, याबाबत कंपनीने आपल्या सोशल मीडिया अकाऊंट्सच्या माध्यमातून माहिती दिली आहे. या टीजर वरून समजले आहे कि हा इवेंट चीन मध्ये 15:00PM वाजता होणार आहे. याचा अर्थ असा कि हा इवेंट तुम्हाला भारतात 12:30PM वाजता दिसेल. चला जाणून घेऊया या फोन्स बद्दल सर्वकाही.

Xiaomi ने एक इमेज शेयर केली आहे जी POCO F2, Redmi K30 आणि Mi Mix 4 च्या लॉन्च कडे इशारा करत आहे. या इमेज मध्ये POCO F2 स्मार्टफोन फुल स्क्रीन डिजाईन मध्ये दिसत आहे, तसेच यात तुम्हाला एक पॉप-अप सेल्फी कॅमेरा पण मिळू शकतो. तसेच Redmi K30 स्मार्टफोन मध्ये तुम्हाला ड्यूल पंच-होल डिस्प्ले मिळू शकतो. असे पण समोर आले आहे कि 10 डिसेंबरला होणाऱ्या या इवेंट मध्ये कंपनी आपला Redmi K सीरीजचा Redmi K30 लॉन्च करू शकते.  

लीक झालेली इमेज बघून असे म्हणता येईल कि डिवाइस मध्ये ओवल शेप्ड पंच होल फ्रंट कॅमेरा मिळेल आणि डिवाइस 5G सपोर्ट सह येईल. पण फोन मध्ये स्नॅपड्रॅगॉन 730 चिपसेट दिला जाईल कि फोन मध्ये स्नॅपड्रॅगॉन 730G मिळणार आहे हे अजून स्पष्ट झाले नाही. फ्लॅगशिप फोन मध्ये एड्रेनो 618 GPU मिळणार आहे.

लीक झालेल्या स्पेक्स वरून समजले आहे कि फोन मध्ये 6.66 इंचाचा डिस्प्ले मिळेल ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz असेल आणि हा स्मूथ इंटरफेस देईल. असे म्हणता येईल कि फोन Redmi K20 Pro प्रमाणे स्नॅपड्रॅगॉन 800 सीरीज सह येऊ शकतो. Xiaomi के CEO Lei Jun ने असे पण सांगितले आहे कि Redmi K30 MIUI 11 सह लाँन्च होईल.

Find out more: