रॉयल एनफिल्डने आपल्या नवीन 650 सीसी फ्लॅट-ट्रॅक मोटारसायकलवरील पडदा हटवला आहे. ही बाईक कंपनीच्या इंटेरसेप्टर 650 आणि कॉन्टिनेंटल जीटी650 वर आधारित आहे. यूकेमधील एका इव्हेंटमध्ये या बाईकवरील सादर करण्यात आले.

 

रॉयल एनफिल्ड 650 फ्लॅट –ट्रॅकरमध्ये एका नवीन फ्रेमचा वापर करण्यात आला आहे, जी कंपनीच्याच मालकीच्या हॅरिस परफॉर्मेंस या कंपनीने तयार केली आहे. यामध्ये ओहिलन्स मोनोशॉकसोबतच ट्विन शॉक एब्जॉर्बर देण्यात आले आहे.

 

याशिवाय यात अपस्वेप्ट एग्जॉस्ट फीचर देण्यात आले आहे जे एएमए फ्लॅट ट्रॅक बाईकप्रमाणे आहे. यामध्ये 19 इंचाचे व्हिल देण्यात आलेले आहेत. खास फ्लट ट्रॅक रेसिंगसाठी यात हँडलबार्स, फूटपेग्स आणि योक्स देण्यात आलेले आहे.

 

काही दिवसांपुर्वीच कंपनीने हिमालयन एफटी 411 लाँच केली होती. त्यानंतर कंपनीने आता 650 सीसी फ्लॅट ट्रॅकरवरील पडदा हटवला आहे. कंपनी भविष्यात यांचे उत्पादन करू शकते.

Find out more: